कार दुर्घटनेत राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांचा होरपळून मृत्यू ……

मृत्यूच्या दारातून कदाचित वाचू शकले असते शिंदे…..

नाशिक : पिंपळगाव बसवन्त : सुरज राजे प्रतिनिधी : खळबळ न्यूज नेटवर्क: १६ ऑक्टोबर :
जिल्ह्यातील चांदवडजवळ मुंबई- आग्रा महामार्गावर चालत्या गाडीला आग लागल्याची धक्कादायक दुर्घटना मंगळवार दुपारी २ ते २:३० च्या दरम्यान घडली आहे. ही आग अधिक भडकल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय शिंदे यांचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाला आहे. हँड सॅनिटायझरमुळं ही आग अधिक भडकल्यानं हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संजय शिंदे हे त्यांच्या कारमधून नाशिककडे जात असताना चांदवडजवळ धावत्या कारनं पेट घेतला. शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं सांगितलं जातंय. त्यातच गाडीत असलेल्या सॅनिटायझरमुळं ही आग अधिक पसरली. ज्यावेळेस ही घटना घडली तेव्हा संजय शिंदे यांनी गाडीतून बाहेर पडण्यासाठी गाडीचा दरवाजा व खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला मात्र, कारचं सेंट्रल लॉक लागल्यानं ते दरवाजा उघडू शकले नाही आणि कारमध्येच होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

ज्ञानसागर : आपत्कालीन परिस्थिती गाडीत उद्भवल्यास आपण स्वत: ला वाचवू शकतो.

 गाडीत आग लागल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे गाडी लॉक झाल्यास सर्वप्रथम गाडीचे हेडरेस्ट काढावे, कारण कोणत्या हि गाडीच्या आसनाचे हेडरेस्ट मुद्दाम सुलभ व तीक्ष्ण ठेवले गेलेले असते. जेणेकरून आग व आपत्कालीन परिस्थितीत मोटारीची काच तोडण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. एकवेळ बाहेरून गाडीच्या काचा सहज तुटणार नाहीत परंतु  गाडीच्या काचा आतून हेडरेस्टच्या साह्याने सहज तोडता येतात. फारच थोड्या लोकांना याबद्दल माहिती आहे.  
मयत संजय शिंदे

Nitin Kapre

Fearless Truth निर्भिड सत्य  जब अंधेरा घना हो।  तो समझो सूर्योदय निकट है।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *