बाळासाहेब जाधव यांनी दिली ३० लाखाची सुपारी….

गोळीबाराचा सी सी टी व्ही फुटेज पहा

मयूर हांडे गोळीबार प्रकरणी अनैतिक संबंधांची किनार…….


हांडेवाडी परिसरात सर्वत्र खळबळ

पुणे : हडपसर प्रतिनिधी : खळबळ न्यूज नेटवर्क: १ ऑक्टोबर : >>>>>व्यावसायिक मयूर विजय हांडे वय २९ रा. हांडेवाडी, मोहम्मदवाडी, पुणे ४११०६० यांच्यावर दिनांक १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील श्रीराम चौक येथे मुखवटा घातलेल्या व्यक्तीने दोन गोळ्या समोरून झाडल्या होत्या. या हल्यात हांडे हे जखमी झाले होते.
या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शींकडे पोलिसांनी चौकशी केली असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोळ्या झाडल्याचे दिसून येत आहे, परंतु त्या व्यक्तीने आपला चेहरा झाकून टाकला होता, ”असे पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले.

गोळीबाराचा जिवंत थरार

अधिक चौकशी केली असता सदर प्रकरणातील आरोपी राजेश भिकू पडवळ वय २५,रा. रागोजहे, ता. हवेली, हा घटना घडण्याच्या ३ दिवस अगोदर पासून या परिसरात फिरत होता. तसेच हा सर्व नियोजित कट असल्याचे तपास यंत्रनेच्या लक्षात आले व त्या दृष्टीने तपासाची चक्र जलदगतीने फिरली व वानवडी पोलिसांनी ४८ तासाच्या आत सदर गोळीबाराच्या घटनेचा तपास करून गुन्हा उघडकीस आणला.

तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील


वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्याशी खळबळ न्यूजच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता सांगितले कि, यातील फिर्यादी मयूर हांडे याचा ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. राजेश पडवळ याने बाळासाहेब अनंत जाधव वय ५२. रा. हांडेवाडी. यांच्या कडून मयूर हांडे यांना मारण्याची ३० लाखाची सुपारी घेतली होती. पडवळ हा वायरमन आहे तर बाळासाहेब जाधव हे व्यावसायिक असून, हांडे यांच्या वर्तनाचा जाधव यांना त्रास होत असल्यानेच त्यांनी पडवळला सुपारी दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सदर प्रकरणाचा जलद तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील व त्यांच्या पथकाने केली व आरोपी राजेश पडवळ आणि बाळासाहेब जाधव यांना अटक केली.

Nitin Kapre

Fearless Truth निर्भिड सत्य  जब अंधेरा घना हो।  तो समझो सूर्योदय निकट है।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *