चुपडी चुपडी चाची ४२० च्या करामती


मंगळवार दिनांक १५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वा. सिद्धिविनायकाच्या ठेवीदारांचे पैसे मिळणार ?

तीन कोटी मिळणार का अडकलेल्या ठेवीदारांचे परत?

पुणे : खळबळ न्यूज नेटवर्क : मुंढवा प्रतिनिधी : १३ सप्टेंबर :
भाग क्रमांक

या अगोदर खळबळ न्यूजने सिद्धिविनायक पतपेढीच्या खातेदारांची कशी फसवणूक झाली याबद्दल सविस्तर बातमी छापली होती. पण गेंड्याची कातडी असलेल्या संचालक मंडळाला साधी खरूज सुद्धा औषध उपचार करून खातेदारांची बरी करता आली नाही. नाममात्र खातेदारांना नाममात्र परतफेड करून तोंडाला कडू लिंबाची पाने पुसली जेणेकरून तोंड कडू झाल्याने त्या खातेदारांनी परत आपले पतपेढीत अडकलेले पैसा मागायला येऊच नये.

लोक आंचे मत माहित असताना देखील नंबर १ वृत्तपत्र म्हणून घेणाऱ्या पत्रकाराच्या कुटुंबाचे पतपेढीत अडकले १५ लाख….
सविस्तर वृत्त पुढील अंकात…
पत्रकार हतबल मुंढवा / केशवनगरमध्ये सर्वत्र खळबळ..

खरे तर सिद्धिविनायक हे नाव विघ्नहर्ताचे, पण आजच्या या कलयुगात केशवनगर /मुंढवा परिसरातील उपद्रवी बांडगुळ रुपी संचालक पतपेढीच्या वृक्षाला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी आश्रय घेऊन चिकटून लोम्बकळली आहेत. या बांडगुळांचा बेकायदेशीर प्लॉटिंगचा, सावकारी व्याजाचा, व इतर,,,,,,,पतपेढीच्या नावाखाली बेकायदेधीर धंदे सुरु असल्याचे खातेदारांमध्ये व नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे. पतपेढीचे हे खातेदारांना सावली देणारे फळाचे वृक्ष वाचवायचे असेल तर या बांडगुळांच्या फांद्या, खातेदारांनी व सहकार खात्याने एकत्रित पणे मुळासकट छाटायला हव्यात अन्यथा हि बांडगुळे उरलीसुरली पतपेढी खाऊन टाकतील. बांडगुळांची जातच ही मादक असते त्यामुळे ती लवकर पसरते व चांगल्या वृक्षाला खाऊन टाकते. या बंडुगुळांमुळे पतपेढी संस्था बदनाम होऊन ठेवीदार देशोधडीला लागल्याचे जाणवते तरीसुद्धा ही बांडगुळ उजळ माथ्याने सार्वजनिक ठिकाणी फिरत आहे, म्हणजे ज्यांची कृत्य काळी ते संचालक तोंडाला गंध पावडर लावून फिरत आहे,, या संचालकांना असे फिरताना लाज सुद्धा वाटत नाही…

!!निर्लजम सदा सुखी !! असो….

राम माणिकराव खोमणे
चेअरमन सिद्धिविनायक पतपेढी, केशवनगर, मुंढवा, पुणे

एका चाचाची सिद्धिविनायक पतपेढीकडून ५०,०००/- दिनांक ३०/०३/२०२० रोजी आवर्तक ठेव व इतर येणे बाकी असताना चाचाच्या मुलाने दिनांक ०५/०४/२०२० रोजी पतपेढीतील “खोटे बोलेल पण रेटून बोलेल” अश्या पतपेढीतील चुपडी चुपडी चाची ४२० ला फोन केला असता कशी खोटी, उडवाउडवीची उत्तरे देती, हे ऐकून असे वाटते कि चुपडी चुपडी चाची ४२० ला राम खोमनेंनी यासाठीच ठेवली आहे.

पतपेढीचे चेअरमन राम खोमणे ठेवीदारांचे फोन उचलत नाही…. !! पतपेढी कि कहाणी चुपडी चुपडी चाची 420 कि जुबानी… !!


त्यानंतर दिनांक १३/०६/२०२० रोजी परत चुपडी चुपडी चाची ४२० ला फोन केला असता परत उडवाउडवीची उत्तरे दिली. गुन्हेगाराला मदत करणारा मोठा गुन्हेगार असतो हे चुपडी चुपडी चाचीला माहित नाही का. चुपडी चुपडी चाची ४२० च्या हातात काही नाही तर मग राजीनामा का देत नाही.

Manager
सिद्धिविनायक पतपेढी, केशवनगर, मुंढवा, पुणे

जनहितार्थ >>>{ बांडगूळ ही इतर वृक्षांच्या फांद्यांवर वाढणारी एक परजीवी वनस्पती आहे.
बांडगुळाच्या फांद्या आश्रयी वनस्पतीच्या फांदीवर लोंबताना दिसतात.
बांडगूळ ही उपद्रवी असल्याने आश्रयी वनस्पतीची फांदी तोडून टाकणे, हाच त्यावर उपाय असतो.

Nitin Kapre

Fearless Truth निर्भिड सत्य  जब अंधेरा घना हो।  तो समझो सूर्योदय निकट है।।

2 thoughts on “चुपडी चुपडी चाची ४२० च्या करामती

  • September 13, 2020 at 2:11 pm
    Permalink

    नितीन शेठ ग्रेट आहेत आपण मला खूप आनंद झाला आहे आपण सत्य परिस्थिती संगीतली जबरदस्त लिखाण

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *