उद्या म्हणजे मंगळवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मिळणार सिद्धिविनायक पतपेढीच्या खातेदारांचे पैसे…… तारीख पे तारीख…….

सिद्धिविनायक पतपेढी ने पुसली ठेवीदारांच्या तोंडाला पाने

पुढील भागात (३ ) खळबळ न्यूज करणार सिद्धिविनायक पतपेढीतील चाची ४२० चा पर्दाफाश !!!!!

पुणे : खळबळ न्यूज नेटवर्क : मुंढवा प्रतिनिधी : २४ ऑगस्ट :
भाग क्रमांक

सोमवार दिनांक १७ ऑगस्ट२०२० रोजी थकीत खातेदारांचे पैसे मिळणार म्हणून सर्व खातेदार एकत्र आले असता एक दमडीही दिली नाही… खातेदारांना उद्या म्हणजे मंगळवार दिनांक २५ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजत रोजी सर्व (मुदत ठेव, डेली रिकरिंग, बचत खाते, ठेवीदारांचे थकीत पैसे देणायचे आश्वासन देऊन ठेवीदारांची केली बोळवण.सर्व ठेवीदार संतप्त.

महिला वर्ग व महिला संघटना होणार सक्रिय… पैसे नाही मिळाले तर संचालकांची निघू शकते वरात.

खळबळजनक निर्भीड सत्य ( विडिओ) :
स्वतःच्या कष्टाचे पतपेढीत ठेवलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या जेष्ठ महिलेची परिस्थिती पाहून खातेदारांच्या डोळ्यात पाणी आले पण तरी सुद्धा संचालकांना पैसे परत करण्याची सद्बुदि झाली नाही

पंचतारांकित संचालक ( ५ स्टार कारभारी ) ………… Damager


वास्तविक पाहता दिनांक १० ऑगस्ट रोजी खातेदार हे सिद्धिविनायक पतपेढी येथे थकीत मुदतठेव डेली रिकरिंग, बचत ठेव व इतर पैसे मिळणार म्हणून जमा झाले होते. त्या दिवशी १७ ऑगस्ट २०२० रोजी सर्वांचे पैसे देऊन टाकू असे स्पष्टपणे पतपेढीचे अध्यक्ष राम माणिकराव खोमणे , प्रकाश बाळासाहेब कोद्रे, व इतर संचालक व व्यवस्थापिका उज्वला नितीन टिळेकर यांनी सांगितले होते असे असताना देखील १० तारखेला जे मोठे खातेदार पैसे मिळावे म्हणून जोरजोरात ओरडून मागणी करीत होते ते सर्व १७ तारखेला काही आलेच नाही तर काही मौन व्रत धारण करून बसले होते. काही तरी पडद्या मागे हालचाली झाल्याचा संशय छोट्या थकीत खातेदारांना आला व महामहिम खातेदारांमध्ये फूट पाडत असल्याचे जाणवले. महामहिम एका एका खातेदारांना एकटे घेऊन सांगत होता कि तुम्ही कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू नका, तरच तुमचे पैसे मिळतील, सहकार खात्याकडे किंवा पोलिसात तक्रार केली तर आम्ही सर्व संचालक, व्यावास्स्थापिका जेल मध्ये जाण्यास तयार आहोत पण त्यानंतर तुमचे पैसे केवड्या रेवड्याच्या स्वरूपात मिळतील अशा प्रकारची धमकी खातेदारांना देत होते.

खळबळ न्यूजचा दणका


खरे पाहता खळबळ न्यूजच्या बातमीमुळे सर्व महामहिम व सर्व संचालकांचे धाबे दणाणले आहेत, सर्वांना पळती भुई थोडी झाली आहे. काही संचालकांचे जवळचे नातेवाईक हे खळबळ न्यूजच्या मुख्या संपादकांना भेटून सिद्धिविनायक पतपेढीची पोलखोल करू नये ही विनंती करण्यास आले होते, तसेच संचालकांच्या नावावरील फ्लॅट व इतर प्रॉपर्टी विकणार आहे पण काही प्रॉपर्टी N .A . नाही व काही सन्मित्र व तसम बँकांकडे तारण आहे त्यामुळे जाहीर विकता येत नाही परंतु खाजगी सावकाराकडे गहाण ठेऊन, पैसे देण्याचे प्रयत्न करत आहोत पण सदर बातमी मुळे पतपेढीचा भांडाफोड झाल्याने जवळचे नातेवाईक सुद्धा पैश्यासाठी दारात येऊन उभे राहिले आहेत.तसेच काही संचालक हे सरकारी नोकरी करत आहेत, खातेदारांनी तक्रार दिली तर गुन्हा दाखल होईल व नोकरी जाईल असे सांगितले. पण सत्य समोर आणण्यासाठी खळबळ न्यूज कटिबद असल्याचे परतीचा निरोप संबंधीतांना धाडण्यात आला.

खळबळजनक निर्भीड सत्य ( विडिओ )
गोविंद भंडारी हे सर्वांचे व स्वतःच्या कुटुंबाचे १८ लाख मिळावेत म्हणून सर्व खातेदारांच्या मुदत ठेव, डेली रेकरिंग, बचत ठेव पावत्या झेरॉक्स फाईल तयार केली पण ती कागतपत्रे कोणाच्या सांगण्यावरून फाडून टाकली हे खातेदारांपुढे एक न उलगडणारे कोडे आहे. असो…… सादर विडिओ मध्ये खातेदारांचे पैसे मिळावे म्हणून गोविंद भंडारी व इतर खातेदार भांडत होते… आता पतपेढीतल्या कुठल्या देवाने गोविंद भंडारी यांना आतल्या हाताने पैसे देतो, पण मीटिंग मध्ये तोंड बंद ठेवा, असे सांगितले हे काही भंडारी समाजाला व इतर खातेदारांना समजेनासे झाले आहे.

गोलमाल है भाई सब गोलमाल है

पुढील भागात (३ ) खळबळ न्यूज करणार सिद्धिविनायक पतपेढीतील चाची ४२० चा पर्दाफाश !!!!!

Nitin Kapre

Fearless Truth निर्भिड सत्य  जब अंधेरा घना हो।  तो समझो सूर्योदय निकट है।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *