सिद्धिविनायक पथसंस्थेतील कॉम्पुटर गेला चोरीला, पोलिसात तक्रार दाखल नाही……. अध्यक्ष राम खोमणे यांच्या कबुलीचा व्हिडिओ

पैसे नसेल देणार तर संचालकांनी स्वतःच्या मिळकती ठेवीदारांच्या नावे कराव्यात…..संतप्त महिला ठेवीदारांची मागणी

साडेतीन कोटींचा आर्थिक घोटाळा !!
ठेवीदारांच्या डोळ्यात संतप्त धारा !!

पुणे : खळबळ न्यूज नेटवर्क : मुंढवा प्रतिनिधी : २८ सप्टेंबर :
भाग क्रमांक
: केशवनगर येथील सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित. येथे मुदत ठेव, आवर्तक ठेव, डेली रिकरिंग, खातेदार सदर पतसंस्थेत स्वतःचे अडकलेले पैसे मागण्यासाठी गेले असता सदर महिलांना अध्यक्ष राम खोमणे व संचालक प्रकाश कोद्रे व इतर संचालकांनी उडवा उडवी ची उत्तर दिली. संतप्त महिला खातेदारांनी संचालक पैसे देत नसल्याने, संचालकांची मिळकत देणेकरी असलेल्या ठेवीदारांच्या नावे करावी अशी मागणी केली. तसेच ठेवीदारांची माहिती संरक्षित असलेला पतसंस्थेत कॉम्पुटर गायब असल्याचे खातेदारांनी अध्यक्ष खोमणे यांच्या निदर्शनास आणून देतास खातेदारानेच पतसंस्थेचा कॉम्पुटर घेऊन गेल्याचे सांगितले. हि गंभीर बाब असतांना देखील त्यावर पथसंस्थेनी कॉम्पुटर चोरून घेऊन गेल्याची तक्रार पोलिसात केली नाही.

सदर सिद्धिविनायक पथसंस्थेतील कॉम्पुटर नालायक, भामट्या निर्लज व घोटाळेबाज संचालकांनी लांबवल्याची चर्चा केशवनगर मुंढवा परिसरात आहे.

अण्णा काय मातोश्रीवरून आदेश येण्याची वाट पाहतात का ? (अण्णा का फंडा)

काय आहे माजी आमदार अण्णांचे ? राम खोमणे व पतसंस्थेशी आर्थिक धागेदोरे…..
नक्की कुणीकुणी खाल्ला सिद्धिविनायकचा प्रसाद…..
निवडणुकीच्या काळात अण्णांनी तर नाही वाटला मतदारांना बेकायदेशीर कर्ज वाटपाचा प्रसाद ?
असे नसेल तर एरवी जनतेच्या किरकोळ प्रश्नांसाठी चमकोगिरी आंदोलन करणारे आता मूग गिळून गप का बसले ? अशी चर्चा हडपसर मतदार संघ सह
मुख्यमंत्र्यांच्या दालनात सुरु आहे.
अण्णा राम खोमनेचा सा..म..ना पीडित ठेवीदारांसाठी करू शकत नाही का ? असा प्रश्न हडपसर मतदार संघातील मतदारांना पडला आहे. 
अण्णांसमोर सिद्धिविनायक पतपेढीच्या राम खोमनेचा पाडा कोणी वाचला कि अण्णा बाराखडी म्हणून दाखवतात… बे एके बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे चौक आठ, बे दुणे दहा इ.. व,
अण्णा आवर्जून सांगतात माझे सुद्धा वयक्तिक अडीच लाख अडकले आहेत त्या नालायकाकडे…. असे असेल तर मतदारांना प्रश्न पडतो कि सिद्धिविनायक पतसंस्थेपुढे आंदोलन करण्यासाठी अण्णा काय मातोश्रीवरून आदेश येण्याची वाट पाहतात का ? 

सिध्दिविनायकचा प्रसाद मिळावा म्हणून ठेवीदारांचे लक्ष महादेव आ कडे लागले आहे. महादेवाचा आशिर्वाद होता म्हणुन सिद्धिविनायक नावारूपास आला हा इतिहास आहे.

निर्भीड सत्य ( बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल)


वास्तविक पाहता सदर पतसंस्थेतील कॉम्पुटर हा चोरीला गेलेला नाही अध्यक्ष राम खोमणे व काही भामट्या, घोटाळेबाज संचालकांनी तो गायब केला आहे. सदर कॉम्पुटर मध्ये असलेला (डेटा एन्ट्री) ठेवीदारांची माहिती उघड झाली तर पतसंस्थेतील घोटाळा उघड होईल. भामटा अध्यक्ष राम खोमणे, व्यवस्थापिका उज्वला नितीन टिळेकर, उपाध्यक्षा सरस्वती महादेव कोद्रे, सचिव दिनेश तुकाराम निकम सह काही चांडाळ संचालकांना येरवडा जेलची हवा खावी लागेल व त्यांना लवकर जामीन सुद्धा मिळणार नाही.
खळबळ न्यूजकडे असलेल्या कागदपत्रांनुसार राम खोमणे सह काही संचालकांनी बनावट मुदत ठेव पावती पुस्तक छापलेले आहे . याची कल्पना व्यस्थापिका टिळेकर सह काही संचालकांना माहित आहे. पण ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ अशी धोकादायक परिस्थिती आहे. काही मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर काही ठेवीदार टिळेकर यांना भेटले असता त्यांनी स्पष्ट सांगितले कि या मुदत ठेवींची नोंद पतसंस्थेच्या कॉम्पुटरवर नाही. ज्या संचालकांकडे तुम्ही पैसे जमा केले, ज्यांनी तुम्हाला मुदत ठेव पावती दिली त्यांच्या कडून पैसे घ्या. असे का झाले कारण एकदा मुदत ठेवीची सिद्धिविनाक पतसंस्थेची पावती मिळाली कि किमान दोन वर्ष ठेवीदार पथपेढीकडे फिरकत नाही. मुदत संपल्या नंतर जेव्हा ठेवीदार पैशाची मागणी करतो तेव्हा त्याच्याशी गोड गोड बोलून व जास्तीचे आमिष दाखवून ठेव रिन्यू (नूतनीकरण) केली जाते. त्यामुळे ठेवीदार मुदत ठेेव पावतीची खातरजमा करून घेत नाहीत.

पुढील भागात खळबळ न्यूज सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था, केशवनगरच्या बनावट मुदत ठेवी पावत्या प्रसिद्ध करणार…..


सरफरोशी कि तमन्ना अब हमारे दिल मे है !
देखना है जोर कितना बाजू कातिल मे है !
खळबळ न्यूज
निर्भीड सत्य

Nitin Kapre

Fearless Truth निर्भिड सत्य  जब अंधेरा घना हो।  तो समझो सूर्योदय निकट है।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *