सिद्धिविनायक पतसंस्थेच्या बनावट ठेवींच्या पावत्या

ठेवीदारांमध्ये खळबळ

साडेतीन कोटींचा आर्थिक घोटाळा !!

पुणे : खळबळ न्यूज नेटवर्क : मुंढवा प्रतिनिधी : ५ ऑक्टोबर
भाग क्रमांक ५ : केशवनगर येथील सिद्धिविनायक नागरी पतसंस्थेच्या नावाने बनावट पावतीपुस्तक छापून ठेवीदारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे कागदोपत्री पुराव्यावरून खळबळ न्यूजच्या निदर्शनास आले आहे. सदरील पावत्या नीट पाहिल्यानंतर हि बाब लक्षात आली.
१) पहिली पावती पाहिल्यास तिची मुदत ठेव ठेवल्याची दि. १७/ ०९/२०१८ असून ठेव पावती नंबर 4188 व व्याज दर १०% असा आहे.

ठेवीदारांची पावती वरील नावे गुप्त ठेवण्यात आली आहे.
ठेवीदारांची पावती वरील नावे गुप्त ठेवण्यात आली आहे.


२) दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या मुदत ठेव ठेवल्याची तारीख १८/०९/२०१८ असून ठेव पावती क्रमांक 3617 , 3618 , 3619 असून व व्याज दर ११% असा आहे.

सदर मुदत ठेवींच्या पावत्या पाहता असे लक्षात येते कि दि. १७/०९/२०१८ रोजीचा पावती क्रमांक ४१८८ आहे व दुसऱ्या दिवशी दिलेली १८/०९/२०१८ रोजी दिलेल्या पावतीचा क्रमांक हा ३६१७ आहे. वास्तविक पाहता सदर १८ तारखेला दिलेल्या पावतीचा क्रमांक ४१८८ च्या पुढील हवा होता परंतु १८ तारखेच्या पावत्यांचा क्रमांक मागील असून त्यात सुद्धा ५७१ पावत्यांचा फरक आहे.
ठेवीदारांपुढे प्रश्न पडला आहे कि यातली कोणती पावती खरी व कोणती बनावट कारण पतसंस्थेचा कॉम्पुटर चोरीला गेल्याची कबुली स्वतः चेअरमन राम खोमणे यांनी खातेदारांना दिली आहे परंतु त्याची तक्रार पतसंस्थेने पोलिसात दिलेली नाही. कॉम्पुटर नसल्याने डेटा एन्ट्री तपासता येत नाही.
खळबळ न्यूजच्या हाती लागलेल्या पावत्यांनुसार ठेवीदार पतसंस्थेकडे शानिशा करण्यासाठी धाव घेतील हे नक्की व त्यातून सत्य काय ते बाहेर येईल.
खळबळ न्यूजच्या प्रतिनिधीने यापूर्वीच काही संचालकांना याची माहिती दिली आहे. पण सदर पावत्यांस चेअरमन राम खोमणे हे जबाबदार असल्याचे सांगत असले तरी सदर बनावट पावत्यांची जबाबदारी सर्व संचालकांवर सुद्धा कायद्याने बंधनकारक आहे हे सर्व संचालकांनी विसरता कामा नये.

सदर मुदत ठेव पावत्या घेऊन ठेवीदारांनी पतसंस्थेत चौकशी केली असता सदर तीन पावत्यांची नोंद पतसंस्थेत नसल्याची बाब ठेवीदारांच्या लक्षात आली. आपली मुदत ठेव पावती खरी कि खोटी हे प्रत्येक मुदत ठेव ठेवीदारांनी तपासली पाहिजे.

ठेवीदारांची पावती वरील नावे गुप्त ठेवण्यात आली आहे.
ठेवीदारांची पावती वरील नावे गुप्त ठेवण्यात आली आहे.

Nitin Kapre

Fearless Truth निर्भिड सत्य  जब अंधेरा घना हो।  तो समझो सूर्योदय निकट है।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *