विधान परिषद सदस्यत्वासाठी विकास लवांडे इच्छुक

vidhanparishad news2020

खळबळ न्यूज :  राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी इच्छुक असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस  कॉंग्रेस चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सोमवारी समाज माध्यमातून जाहीर केले आहे. 

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी माझी योग्यता आहे .सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात योगदान आहे .ग्रामीण भागात सेवाभावी व शिक्षण संस्था आहे सामाजिक कार्यकर्ता तसेच साप्ताहिक समाजसत्ता मी मालक व संपादक म्हणून 4 वर्षे अखंड चालवले आहे.

पत्रकार म्हणून सुद्धा मी पात्र ठरतो आहे. माझा  पक्षाने विधान परिषद सदस्यत्वासाठी  विचार करावा. पक्षाच्या मूलभूत विचारांशी मी कायम बांधील असलेला व सामाजिक चळवळीतील अनेक वर्षांपासून सक्रिय कार्यकर्ता आहे.

कृपया आपली साथ मिळावी.’असे मनोगत  त्यांनी समाज माध्यमातून व्यक्त केले आहे .  ‘मी विधानमंडळाला व समाजाला अभिप्रेत असलेले काम नक्की करू शकतो’,असेही विकास लवांडे यांनी म्हटले आहे. 

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वा च्या १२ जागा असून राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागांसाठी शिफारस करू शकते . दिनांक १५ जून नंतर या नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता आहे.  

युवक क्रांती दल ते राष्ट्रवादी कॉंग्रेस असा प्रवास करताना समाजातील अन्याय ग्रस्तांसाठी केलेल्या संघर्षाचा उल्लेख विकास लवांडे यांनी या मनोगतात व्यक्त केला आहे .

मान -अपमान किंवा पैसा- पद – प्रतिष्ठा याचा कधी विचार केलाच नाही.समाजहितासाठी राजकारण संसदीय लोकशाहीत अटळ असते. संविधानिक निवडणूक प्रक्रियेत मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या कुणीही स्वतःला अराजकीय म्हणवून घेणे भाबडेपणा किंवा चूक आहे.

मी आदरणीय शरदराव पवार साहेबांवर विश्वास व निष्ठा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मूलभूत विचारांशी बांधिलकी ठेवून सक्रिय आहे व कायमच असणार आहे. पवार साहेब म्हणजे  एक व्यक्ती नसून विचार आहेत. सर्वांसाठी ते एक चालत बोलत फिरते  राजकीय विद्यापीठ आहे. मला ते महत्वाचे वाटते ‘,असेही त्यांनी या मनोगतात म्हटले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *